DNA Live24 2015

विदर्भात होणार नवी एमआयडीसी


मुंबई :
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कमीत कमी पंचवीस हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज संबंधितांना दिले.

मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत चांदूरबाजार येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार बच्चू कडू, एमआयडीसी (मुंबई)चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे, तेजुसिंग पवार, एमआयडीसी अमरावतीचे प्रादेशिक अधिकारी श्री.फुके आदी उपस्थित होते. याशिवाय अचलपूर तालुक्यातील एमआयडीसीचा भूगावपर्यंत विस्तार करण्याबातचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही श्री.पोटे-पाटील यांनी दिले. स्थानिकांना रोजगार, उद्योगांना पोषक वातावरण मिळण्यासाठी सर्व सुविधायुक्त एमआयडीसीची आवश्यकता आहे. चांदूरबाजार येथे एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचेही श्री.पोटे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget