DNA Live24 2015

मंजूर निधी मुदतीत खर्च करा : पालकमंत्री प्रा. राम शिंदे


अहमदनगर :
जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्‍हा विकासासाठी मंजूर निधीच्‍या खर्चाचे योग्‍य नियोजन करावे व निधी विहित मुदतीत खर्च करावा,अशा सूचना राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍ट्राचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिल्‍या.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा नियोजन समितीची बैठक झाली.  यावेळी  जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार संग्राम जगताप, आमदार स्‍नेहलता कोल्‍हे,आमदार मोनिकाताई राजळे, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्‍हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्‍हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, प्रकल्‍प अधिकारी संतोष ठुबे, समाज कल्‍याणचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे  आदिंची यावेळी उपस्थिती होती.

लकमंत्री प्रा.शिंदे म्‍हणाले, जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत सर्व साधारण योजनेसाठी अहमदनगर जिल्‍हयाला सन 2017-18 साठी 569 कोटी 86 लाख 75 हजार मंजूर निधीपैकी 563 कोटी 57 लाख 77 हजार एवढा निधी खर्च झाला आहे. एकूण 98.90 टक्‍के खर्च झाला असून अहमदनगर जिल्‍हा निधी खर्चात अव्‍वल क्रमांकावर असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्‍हा वार्षिक योजनेत सन 2017-18 च्‍या पुनर्विनियोजन प्रस्‍तावाना यावेळी मान्‍यता देण्‍यात आली. मंजूर निधी प्रस्‍तावित योजनांसाठी वेळेत खर्च करण्‍यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी प्राधान्‍य द्यावे अशा सूचना त्‍यांनी यावेळी केल्‍या. जिल्‍हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत 588 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्‍याचे पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी सांगितले.
 या बैठकीत मागील विषयाच्‍या अनुषंगाने इतिवृत्‍तावर चर्चा झाली व इतिवृत्‍ताला मंजूरी देण्‍यात आली. दरम्‍यान जिल्‍हयातील अंगणवाडयांच्‍या वीज व्‍यवस्‍थेसंदर्भात धोरणात्‍मक निर्णय घेण्‍यासाठी तातडीने प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सूचना पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दिल्‍या. तसेच वीज बिल अभावी बंद असलेल्‍या व रखडलेल्‍या  पाणी पुरवठा योजने संदर्भात पुढील आठवडयात स्‍वतंत्र बैठक घेण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले. जिल्‍हयातील  रस्‍त्‍यांची  रखडलेली कामे ऑक्‍टोबरअखेर पूर्ण करण्‍याच्‍या सूचना  पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संबधित अधिका-यांना दिल्‍या तसेच अंगणवाडी व शाळा खोली बांधकामाची मर्यादा वाढविण्‍याबाबत  ठराव करण्‍यात आला असून याबाबत  शासन पातळीवर आपण पाठपुरावा करणार असल्‍याचे  प्रा. शिंदे यांनी सांगितले.           

यावेळी जिल्‍हयातील हासोबा देवस्‍थान,सडे ता. राहुरी, शृंगेश्‍वर मंदिर देवस्‍थान, संवत्‍सर ता.कोपरगाव, श्री मारुती मंदिर ट्रस्‍ट, सावरगांव ता.पारनेर, ओम गुरुदेव जंगली महाराज मेरुदंड आश्रम देवस्‍थान, इमामपूर ता. नेवासा, श्री क्षेत्र का‍शी केंदारेश्‍वर  देवस्‍थान, नागलवाडी ता. शेवगाव,  श्री सिध्‍देश्‍वर महाराज  देवस्‍थान, लिंपणगाव ता. श्रीगोंदा, श्री मुदगुलेश्‍वर  मंदिर देवस्‍थान, आर्वी ता.श्रीगोंदा, श्री अंबिका माता देवस्‍थान, वांगदरी ता. श्रीगोंदा,  खंडोबा देवस्‍थान कौठे बु. ता. संगमनेर,  श्री शेषनारायण देवस्‍थान कुंभेफळ ता.अकोले, श्री महादेव व मारुती मंदिर कुंभेफळ ता.अकोले, भैरवनाथ देवस्‍थान कोंभळी ता.कर्जत, श्री पावन मारुती  देवस्‍थान शिंगवे केशव ता. पाथर्डी, श्री हंगेश्‍वर देवस्‍थान, हंगेवाडी ता. श्रीगोंदा,  श्री क्षेत्र एकमुखी  दत्‍त देवस्‍थान जोर्वे ता. संगमनेर, श्री बिरोबा मंदिर देवस्‍थान, धांदरफळ खुर्द ता. संगमनेर,  श्री नागनाथ महाराज देवस्‍थान,हिरडगाव ता. श्रीगोंदा, श्री चांडैश्‍वर देवस्‍थान, चांडगाव ता. श्रीगोंदा, श्री सिध्‍देश्‍वर (महादेव) महाराज देवस्‍थान, आढळगाव ता.श्रीगोंदा, श्री केदारेश्‍वर देवस्‍थान,सातेफळ ता.जामखेड,  श्री शनि मंदिर  गोगलगाव ता. राहाता, रामगिरीबाबा देवस्‍थान,  पाथर्डी  व दैवदैठण देवस्‍थान, जामखेड  या यात्रास्‍थळांना क वर्ग दर्जा प्रदान करण्‍यात आला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget