DNA Live24 2015

न्यू आर्टस् कॉलेज संघाची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालयात नुकतेच झालेल्या आंतर महाविद्यालय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 4 सुवर्ण पदक पटकाविले. तसेच जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान देखील न्यू आर्टस महाविद्यालयाला मिळाला आहे.

या स्पर्धेत प्रतिभा डोंगरे (50 किलो वजनगट), प्रियंका डोंगरे (57 किलो वजनगट), माधुरी खरमाळे (59 किलो वजनगट), शिल्पा मत्रे (68 किलो वजनगट) या कुस्तीपटूंनी सुवर्ण पदक पटकाविले. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालयीन महिला कुस्तीपटूंनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला होता.
सुवर्ण पदक पटकाविणार्‍या महाविद्यालयातील खेळाडूंची बारामती, सोमेश्‍वर नगर (जि. पुणे) येथे काकडे महाविद्यालयात होणार्‍या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागाचे डॉ.शरद मगर, धनंजय लाटे, धन्यकुमार हराळ, सुधाकर सुंबे, नगर तालुका तालिम सेवा सघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशी, सहसचिव अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर, प्राचार्य भास्करराव झावरे, उपप्राचार्य डॉ.अरुण पंधरकर, प्रा.आर.जी. कोल्हे, डॉ.एम.व्ही. गिते आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget