DNA Live24 2015

जपानी शेतकरी नियमित वापरतात ड्रोन

टोकियो (जपान) :
भारतात ड्रोन कशासाठी आणि कुठे वापरायचा याबद्दल सरकार दरबारी चर्चा सुरु आहे. त्यासाठीचे नवे निकष जाहीर होत असतानाच जपान आणि इतर अमेरिकन व युरोपीय देशांत ड्रोनचा शेतीमधील नियमित वापर सुरू आहे. जपानमध्ये औषधे व कीटकनाशक फवारणीसाठी याचा सर्रास वापर केला जात आहे.

जपानमध्ये शेतमजूर मिळत नसल्याने शेतीमधील यांत्रिकीकरणाला खूप महत्व आहे. तेथील सरकारनेही अधिनिक कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने विषमुक्त शेतमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. ड्रोन या यंत्राचा तेथे नियमित वापर होत आहे. भात असो की फळबागा त्यासाठी या देशात ड्रोन वापरले जाते. त्याच धर्तीवर आता भारतातही मोठे शेतकरी ड्रोनचा वापर करण्यासाठी विचारात आहेत. भर सरकारच्या नव्या नियमावलीचा त्यांना मोठा फायदा होईल असे दिसते.


Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget