DNA Live24 2015

12 साखर कारखानदारांकडे अडकले 102 कोटी रूपये

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा

सोलापूर  : प्रतिनिधी
मागील हंगाम संपून 7 महिने  झाले, आता दुसरा हंगाम येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार असला तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. ते पैसे तातडीने अदा करावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरूवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सात रस्ता येथेच मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी रोखले. सात रस्ता ते  गांधीनगरपर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. या मोर्चासाठी खा. राजू शेट्टी येणार होते. मात्र एक दु:खद घटना घडल्याने ते सोलापुरात आले नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, 2017 -18 या हंगामात एफआरपी अ‍ॅक्टनुसार 14 दिवसांच्या आत ऊस बिल देणे कारखान्यांना बंधनकारक असताना सोलापूर जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांनी 7 महिन्यांपासून शेतकर्‍यांचे 102 कोटी रूपये थकवले आहेत. आधीच पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. त्यात या साखर कारखान्यांनी पहिला हप्ताही शेतकर्‍यांना दिला नाही. येत्या पंधरा दिवसांत गाळप हंगाम सुरू होणार आहे. सहकार मंत्री या नात्याने सुभाष देशमुख यांनी तातडीने शेतकर्‍यांची व्याजासहित रक्कम देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी कारखान्याचे 16 कोटी रूपये थकले होते. परंतु भीमाने आता वाटप सुरू केले आहे. तसेच सोलापुरातील सिध्देश्‍वर कारखान्याचे 39 कोटी रूपये थकले होते, त्यांनीही एफआरपीचे वाटप सुरू केले आहे. परंतु दामाजी साखर कारखाना 5 कोटी, मकाई कारखाना 3 कोटी रूपये, कुर्मदास 2 कोटी, सिध्दनाथ कारखाना 5 कोटी, गोकुळ शुगर 9 कोटी, मातोश्री 23 कोटी रूपये, बबनराव  शिंदे कारखाना 2 कोटी, विठ्ठल रिफाईनरी, पांडे 15 कोटी, लोकमंगल अ‍ॅग्रो 3 कोटी, तर लोकमंगल शुगर 5 कोटी रूपये थकले आहेत. या सर्व कारखान्यांनी तातडीने शेतकर्‍यांची एफआरपीची रक्कम अदा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मोर्चात पप्पू पाटील, इक्बाल मुजावर, सचिन पाटील, वसंत गायकवाड, उमाशंकर पाटील, तानाजी बागल, नवनाथ माने, नरेंद्र पाटील, बिळ्याणी सुंटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget