DNA Live24 2015

कृष्‍ठरोग शोध मोहिम 24 सप्‍टेंबरपासून

अहमदनगर :
केंद्र शासनाच्‍या पंतप्रधान प्रगती योजनेच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयात दिनांक 24 सप्‍टेबर 2018 ते 9 ऑक्‍टोबर 2018  या कालावधीत  कुष्‍ठरोग शोध मोहिम 2018 ही संपूर्ण महाराष्‍ट्रात तसेच अहमदनगर जिल्‍हयात राबविण्‍यात येणार आहे.  समाजातील सर्व घटकांना कृष्‍ठरोग विषयक सद्यस्थिती सल्‍ला, औषधोपचार व कुष्‍ठरोग विषयक असणारे गैरसमज व कृष्‍ठरोगाची शास्‍त्रीय माहिती समाजाला होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.
            जिल्‍हयातील प्रत्‍येक गावात, वाडी, वस्‍तीवर घरोघरी जाऊन अशा कार्यकर्ते व पुरुष स्‍वयंसेवक यांच्‍यामार्फत प्रत्‍येक व्‍यक्‍तीची कृष्‍ठरोग विषयी तपासणी करण्‍यात येणार आहे.  या मोहिमे दरम्‍यान आढळून येणा-या संशयीत रुग्‍णांची तज्ञ डॉक्‍टरांकडून निदाननिश्चित करुन उचार करण्‍यात येणार आहेत. मोहिमे दरम्‍यान येणा-या पथकाकडून न चुकता तपासणी करुन घ्‍यावे व पथकास सहकार्य करावे. जिल्‍हयात 2 हजार 878 टीम तर 568 टीम सुपरवायजर यांची सर्व्‍हेक्षणासाठी निवड करण्‍यात आलेली आहे.
            या कार्यक्रमास समाजाचे सहकार्य मिळावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अति. जिलहा आरोग्‍य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे व सहाय्यक संचालक  अरोग्‍य सेवा ( कृष्‍ठरोग) डॉ. गणेश शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget