DNA Live24 2015

पेट्रोलियम पदार्थ 2 रुपयांनी स्वस्त झाले..!

बेंगळुरू :
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारने राज्यातील जनतेला अल्पसा दिलासा म्हणून पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रूपये प्रति लिटरची कपात केली आहे. कानडी जनतेने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

सोमवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात १५ पैसे प्रतिलीटरने वाढ झाली तर डिझेलच्या दरात ६ पैशांची वाढ झाली. पेट्रोल ८२.०६ तर डिझेल ७३.७८ पैसे प्रतिलीटर झाले. तर, मुंबईतही पेट्रोलच्या दरात १५ पैशांची वाढ होऊन ते ८९.४४ रूपये प्रतिलीटर तर डिझेलच्या दरात ७ पैशांची वाढ होऊन प्रतिलीटर ७८.३३ रूपये इतका झाला.

देशात अशी स्थिती असतानाच मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी २ रुपयांनी दर कमी करण्याची घोषणा केली. कानडी नागरिकांना इंधन दरवाढीची झळ पोहोचू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget