DNA Live24 2015

किफायतशीर शेळीपालन तंत्रज्ञान (भाग 3)


अडचणींवर मात करून शेळीपालन करा फायदेशीर

अवास्तव माहिती मिळवून, भांडवली खर्च वाढवून शेळीपालन न करता शेळीपालकांशी चर्चा करून यश वा अपयशामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. शेळीपालन व्यवसायाची संपूर्ण काटेकोर माहिती विविध शासकीय संस्थांकडूनच करून घ्यावी. त्यामुळे येणार्या अडचणींवर मात करून शेळीपालन व्यवसाय अधिक फायदेशीर करता येईल.

शेळी हा अत्यंत काटक व कमीत कमी खर्चात जगणारा प्राणी आहे. आधुनिकतेच्या नावाखाली शेळी संगोपनावरचा खर्च वाढत आहे. शेळी व्यवसायाबाबत होणार्या अवास्तव जाहिरातींकडे आकर्षित होऊन सुशिक्षित बेरोजगार, गुंतवणूकदार, व्यवसायाभिमुख उच्च शिक्षित तरुण वर्ग या व्यवसायाकडे वळत आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना शेतकर्यांना शेळीपालनाकडे आकर्षित करीत आहेत. मात्र या सर्व बाबींचा अवलंब योग्य मार्गाने होत नाही. अपुर्या ज्ञानावर, भांडवल आहे म्हणून शेळीपालन व्यवसाय करणे टाळावे.

शेळीपालनातील अडचणी
- शेळीपालनाबाबत असणारी अपुरी व अवास्तव माहिती.
- शेळीपालनाकडे वळणार्या भांडवलदार तरुण वर्गाची फसवणूक करणार्या संस्था.
- शेळी पैदास व आहार व्यवस्थापनावर होणारा अतोनात व अनावश्यक खर्च.
- शेळ्यांच्या गोठ्याबद्दल अवास्तव माहिती मिळवून भांडवली खर्चात होणारी अनावश्यक वाढ.
- शेळ्यांची अकार्यक्षम पणन व्यवस्था.
- शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापनाकडे होणारे दुर्लक्ष.
- अनियंत्रित शेळी पैदास तसेच वाहतूक.
- शेळ्यांचे किफायतशीर व्यवस्थापनावर वास्तववादी प्रशिक्षण देणार्या घटकांचा अभाव.
- शेळीचे दूध उत्तम औषधीयुक्त असूनही त्याच्या वापराकडे होणारे दुर्लक्ष.
- पुरेशी माहिती न घेता शेळ्यांच्या गोठ्यावर केला जाणारा नाहक खर्च.
- शेळ्यांची नैसर्गिक बलस्थाने कोणती व त्याचा वापर आहारावरील खर्चात बचत करण्यासाठी कसा करावा याबाबत अनभिज्ञता.
- शेळ्यांपासून प्रचंड उत्पन्न मिळवता येते असे दाखवणार्या यशोगाथा.
- शेळ्यांमध्ये येणारे नवीन आजार व शेळ्यांच्या नवीन जातींची ओढ.
- चुकीच्या शेळीपालन पद्धतीचा अवलंब.

*

लेखक
डॉ. संजय मंडकमाले,
वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वीत संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर. फोन : 02426 243455

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget