DNA Live24 2015

कुकडी प्रकल्पाच्या 3948.17 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंत्रीमंडळाची मंजुरी

मुंबई :
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या 3977.85 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय
मान्यतेस आज मंत्रीमंडळात मंजुरी दिली आहे. तसेच आदिवासी उपयोजनेतून या क्रांतीकारी निर्णयामुळे
कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालवा क्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील अवर्षण
प्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. चौंडी, दिघी, जवळा बंधारा, तुकाई व बिटकेवाडी या
योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती मृद
व जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, पुणे, अहमदनगर व सोलापूर
जिल्ह्यातील दुष्काळी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाच धरणांच्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या तृतीय
सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. यामुळे भूसंपादन व कालवा
अस्तरीकरणांची कामे थांबली होती. तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहमदनगर
जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी
मिळत नव्हते. आजच्या निर्णयामुळे कालव्याद्वारे या तालुक्यांपर्यंत पाणी पोहचणार आहे. येडगाव,
माणिकडोह, वडज, डिंभे व पिंपळगाव या पाच धरणांचा समावेश कुकडी प्रकल्पामध्ये आहे. या
प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 864.48 द.ल.घ.मी. इतका आहे. वरील
सात तालुक्यातील एकूण 1,44,912 हेक्टर क्षेत्रास 718.50 किमी लांबीच्या विविध कालव्याद्वारे
सिंचनाच लाभ मिळणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget