DNA Live24 2015

90 टक्‍के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्‍टर..!

अहमदनगर :
सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्‍द  घटकांतील स्‍त्री/पुरुष  स्‍वयंसहाय्यता  बचत गटांना 90 टक्‍के अनुदानावर   मिनी ट्रॅक्‍टर  व त्‍याची  उपसाधने कल्टिव्‍हेटर  किवा रोटॅव्‍हेटर व ट्रेलरचा शासन स्‍तरावर पुरवठा करण्‍यात येत होता. आता यामध्‍ये बदल करण्‍यात आलेला असून  शासनाद्वारे  थेट   लाभ  हस्‍तातरण (डीबीटी) कार्यप्रणालीनुसार विविध कल्‍याणकारी योजनांमध्‍ये  वस्‍तू स्‍वरुपात मिळणा-या लाभांचे (अनुदान) हस्‍तांतरण रोख स्‍वरुपात थेट लाभार्थ्‍याच्‍या बँक खात्‍यात जमा करण्‍यात येणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांतील स्‍वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने कल्टिव्‍हेटर किंवा रोटॅव्‍हेटर व ट्रेलर  याची खरेदी  करण्‍याचे अधिकार लाभार्थी बचत गटांना देण्‍यात आले आहेत. लाभार्थी  स्‍वयंसहाय्यता बचत गटांना  किमान 9 ते 18 अश्‍वशक्‍तीपेक्षा जादा शक्‍तीचा ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने खरेदी  करता येतील. त्‍यांची किमंत शासकीय अनुदानापेक्षा (3 लाख 15 हजार अनुदान रक्‍कम)  जास्‍त  असल्‍यास कमाल  अनुज्ञेय  अनुदाना व्‍यतिरिक्‍त जादाची रक्‍कम बचत गटांनी स्‍वतः खर्च करावी लागणार आहे.

सन 2018-19 या आर्थिक  वर्षाकरिता योजनेचे निकष पूर्ण करुन मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची  उपसाधने  याची खरेदी शासनाचे अनुदान मिळण्‍यापूर्वी  स्‍वतः करु इच्छित असणा-या स्‍त्री व पुरुष स्‍वयंसहाय्यता बचत गटांकडून अर्ज मा‍गविण्‍यात येत आहेत.  विहित नमुन्‍यातील अर्ज सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण  यांचे कार्यालय, अभिविश्‍व कॉम्‍प्‍लेक्‍स बोल्‍हेगाव फाटा  नगर मनमाड रोड  अहमदनगर येथे विनामूल्‍य उपलब्‍ध आहेत. पात्र स्‍वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज प्राप्‍त करुन  अर्जात्‍ नमूद करण्‍यात आलेल्‍या  संपूर्ण कागदपत्रासह अर्ज जमा करावेत असे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget