DNA Live24 2015

ठिंबक सिंचनसाठी 95 टक्के सबसिडी देण्याची मागणी

अहमदनगर :
देशातील 67 टक्के अल्पभूधारक शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने मेरे खेत मे, मेरा अपणा ठिबक सिंचन आंदोलन जारी करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे अल्पभूधारक शेतकर्‍यांना ठिंबक सिंचनसाठी 95 टक्के सबसिडी मिळण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

देशातील मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कुटुंबात बेकारी व दारिद्रय हे प्रश्‍न भेडसावत आहे. कमी जमिनीवर अधिक उत्पन्न मिळवून आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी ठिबक सिंचन व शेतीचे आधुनिक तंत्र काळाची गरज बनली आहे. ठिबक सिंचनचा सर्व अल्पभूधारकांनी अवलंब केल्यास एका वर्षात मोठा बदल घडून शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने अल्पभूधारकांना ठिबक सिंचनसाठी 95 टक्के सबसिडी देण्याची संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

इस्रायल सारख्या देशाने कसण्यासारखी जमीन व पाणी नसताना देखील ठिबक सिंचन, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे  प्रगती केली. याची जागृती होणे आवश्यक आहे. शेतीमधील बेकारी व गरिबी हटविण्यासाठी ठिबक सिंचन हा एकमेव तंत्र आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देणे हा कायमचा उपाय नसून, अशा योजनांना प्रोत्साहन दिल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास आत्महत्या देखील थांबणार आहे. ज्या ठिकाणी पाणी सहज उपलब्ध आहे तेथे शेतकरी पाण्याची उधळपट्टी करतात. मात्र जेथे पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागत आहे. देशात सर्वात मोठा रोजगार देण्याची क्षमता आजही शेतीत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे 95 टक्के सबसिडी शेतकर्‍यांना मिळू शकते. अल्पभूधारक शेतकरी जगविण्यासाठी हा एकमेव उपाय असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मागणीसाठी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, सखुबाई बोरगे, फरिदा शेख आदि प्रयत्नशील आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget