DNA Live24 2015

हुमणीमुळे ऊस उत्पादक हैराण


हुमणी किडीचा प्रादुर्भाव सध्या राज्यभर दिसत आहे. यामुळे उसासह सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. या किडीचे नुकसान प्रामुख्याने ऑगस्ट-सप्टेंबर जास्त दिसते. त्यामुळेच याच्या नियंत्रणासाठी ठिबकद्वारा पाण्यामध्ये थेंब-थेंब क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के ईसी) पाच लिटर प्रति हेक्‍टर सोडावे.

एकात्मिक कीड नियंत्रण

उन्हाळ्यात खोल नांगरट, त्यामुळे जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था (प्रौढ कीटक) नाश पावतात.

लागवडीपूर्वी चारीत एरंडी खत (250 किलो प्रति हेक्‍टर) दिल्यास भुईमुगातील नुकसान टाळणे शक्‍य.

यजमान झाडांवर फवारणी- (प्रति 10 लिटर)
कार्बारील (60 टक्के)-20 ग्रॅम किंवा
थायोडीकार्ब (75 टक्के) 10 ग्रॅम
द्रावण सर्व पानांवर व्यवस्थितरीत्या फवारावे.

पीक लागवडीपूर्वी :  फोरेट (10 टक्के दाणेदार)- 25 किलो प्रति हेक्‍टर प्रमाणे जमिनीत टाकावे.

भुईमूग पेरण्यापूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस (25 टक्के ईसी) 25 मिली प्रति किलो प्रक्रिया. तीन तास सावलीत वाळवून पेरणी करावी.

हुमणीचे नैसर्गिक शत्रू- बगळा, चिमणी, घार, कावळे, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस हे हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.

परोपजीवी बुरशी-बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम ऍनिसोपली),
जिवाणू-बॅसीलस पॉपीली
सूत्रकृमी- हिटरोऱ्हॅब्डिटीस व स्टेनरनेमा

पीक फेरपालट- एरंडी, कापूस अथवा तुरीला पसंती द्यावी.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget