DNA Live24 2015

आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

अहमदनगर :
शहरातील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने सावेडी येथील एकवीरा चौकात आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. तर आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.

यावेळी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे, शहराध्यक्ष राजू अनमल, नगरसेवक महेश तवले, संदीप यादव, आकाश खरपे, स्वप्नील चव्हाण, निलेश थोरात, शितल गुड्डा, शैला गायकवाड, सुजाता कोटा, सचिन अकोलकर, बाबू चव्हाण, विशाल भालेराव, देविदास चव्हाण, अ‍ॅड.महेश काळे, अ‍ॅड.मंगेश सोले, तेजस पटेकर, दादा जंगम, ओम दोन्ता, संदीप गुड्डा, दिनेश जरे, सुनील शिंदे, आकाश कोदे आदी उपस्थित होते.

 या घटनेने शहराची मान शरमेने खालवली आहे. अत्याचार करणार्‍यांवर कायद्याचा धाक नसल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा झाल्यास अशा घटना घडणार नाही. तसेच तपोवन रोड येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी अटक असून, इतर सहआरोपी अद्यापि फरार आहे. पिडीतांना न्याय मिळण्यासाठी आरोपींवर कठोर शासन होणे अपेक्षित असल्याचे सोमा शिंदे यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.नि. संपत शिंदे यांना देण्यात आले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget