DNA Live24 2015

कामांना गती द्या : गांधी


अहमदनगर :
जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असून महामार्गाच्या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडथळा आला असेल, तेथील नागरिकांशी तातडीने चर्चा करुन विषय मार्गी लावाआणि कामांना गती द्या, असे निर्देश खासदार दिलीप गांधी यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज (मंगळवारी) रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. दिवाण, उपविभागीय अधिकारी (कर्जत-जामखेड) अर्चना नष्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जी.एन. मोहिते, कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, सहायक नगररचनाकार वैभव जोशी, जागतिक बॅंक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व श्री. खान, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. गुंजाळ, महापालिकेचे नगर अभियंता श्री. सोनटक्के यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी खासदार गांधी यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या कामांचा वेग ज्याठिकाणी कमी आहे तसेच काही ठिकाणी कामे थांबल्याचे दिसत आहे, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.  कामे सुरु करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कऱण्याचे निर्देश दिले. वेगवेगळया यंत्रणांनी समन्वय ठेवून काम केल्यास अधिक गतीने काम होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी भूसंपादनास अडचण असेल, किंवा भूसंपादन होऊनही कामे सुरु करण्यात विरोध असेल, तर तेथील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवा आणि कामांना गती द्या, अशा सूचना यावेळी खा. गांधी यांनी दिल्या.

प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणांकडे लक्ष देण्याची गरज असून जी अतिक्रमणे शासकीय जागेत आहेत, ती तात्काळ काढण्याची सूचना त्यांनी केली.  शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

शहरात वाहतुकीच्या प्रश्नाने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांवर, विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाला दिल्या. फॅन्सी नंबर्स असणाऱ्या दुचाकी अथवा मोठी वाहने तसेच विना नंबर्स चालवण्यात येणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची मोहिम गतीमान करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget