DNA Live24 2015

उत्कृष्ट शेतकरी गटांना पुरस्कार


मुंबई :
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने गट शेती योजना यापूर्वीच सुरू केली आहे. या योजनेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना पुरस्कार देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आजच्या निर्णयानुसार उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना 25 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, 10 लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गट शेती योजनेंतर्गत मंजूर गटांना प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के अथवा जास्तीत जास्त एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच हे अनुदान प्रचलित इतर योजनेमधून मिळणाऱ्या अर्थसहाय्याव्यतिरिक्त असेल. राज्यात 2017-18 व 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर तरतुदीच्या अधीन राहून जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यास कृषी आयुक्तांना मंजुरी देण्यात आली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget