DNA Live24 2015

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवणार राजधर्म भंगाचा ठपका"

अहमदनगर:
देशातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी असतित्वात आलेल्या लोकपाल कायद्याची व इतर योजनांची घोषणा करुन त्याची अंमलबजावणी न करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घरकुल वंचित राजधर्म भंगाचा ठपका ठेवणार आहे. रविवार दि.30 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकात हे आंदोलन होणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
2013 डिसेंबर आखेर मनमोहनसिंग सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी देऊन भारतात लोकपाल व लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला. हा कायदा होण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन निर्णायक ठरले. 2014 साली भाजप सत्तेवर आले. मात्र अद्यापि लोकपाल कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. सत्तेवर आल्यानंतर अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. त्याची देखील अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. भाजप सरकार संसदेने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. याला पंतप्रधान मोदी जबाबदार ठरत आहे. जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनेकवेळा सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली. अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. याला प्रतिसाद न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशाहीने राज्यकारभार चालवित असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सत्तेवर येण्यापूर्वी परदेशातील काळा पैसा देशात आणण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेवर आल्यानंतर शहर व ग्रामीण भागातील घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा करुन घरांची स्वप्ने दाखविण्यात आली. आदि अनेक घोषणा भाजप सरकारने केल्या असून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. घरे बांधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अडीच लाखाचे अनुदान ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना मिळत असून, घरकुल वंचितांच्या नावावर दुसर्‍यांनाच हा निधी दिला जात आहे. घरकुल वंचितांचे घरे होण्यासाठी संघटनेने हायब्रीड लॅण्ड पुलिंग व घरकुल गहाण बँक क्रेडिटची मागणी केली असून, याला सत्ताधारी प्रतिसाद देत नाही. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान आवास योजना म्हाडाकडे वर्ग करुन संयुक्त भागीदारी धोरण स्विकारले. याची देखील अंमलबजावणी होत नसल्याचे घरकुल वंचितांमध्ये असंतोष पसरला आहे. भाजप सरकारमध्ये उन्नत चेतनेचा अभाव असून, गरिबांचे अश्रू पुसण्याचा विसर त्यांना पडला असल्याचा आरोप अ‍ॅड.गवळी यांनी केला आहे. या आंदोलनात कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, निर्मला पेंढारे, लक्ष्मी दुस्सा आदि सहभागी होणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget