DNA Live24 2015

माजी सैनिकांनी केले शिवाजीनगर परिसरात वृक्षारोपण


अहमदनगर :


वृक्षारोपण व संवर्धन मोहिम हाती घेतलेल्या माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन रोड, शिवाजीनगर येथील हनुमान मंदीर परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

मुंबई येथील जय जवान, जय किसान फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मोडक यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत चहाळ, अतुल ग्रुपचे डॉ.वाळुंजकर, श्याम नापते, भारतीय सेनेचे कनिष्ठ अभियंता डॉ.दिपक दरंदले, बाळासाहेब पवार, विनोद शेलार, सुशमा मोडक, मदन पालवे, रामेश्‍वर पोटे, सरला कर्डिले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात संघटनेचे सचिव जगन्नाथ जावळे यांनी माजी सैनिकांनी राबविलेल्या सामाजिक कार्य व वृक्षरोपण अभियान मोहिमेचा आढावा घेतला. जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण हा एकमेव पर्याय आहे. नैसर्गिक चक्र बिघडले असताना याचा फटका शेतकर्‍यांसह सर्वांना बसत आहे. सप्टेंबर मध्ये 200 वृक्ष लावण्याचा संकल्प अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी व्यक्त करीत वृक्षरोपणाचे आवाहन केले.

ज्ञानेश्‍वर मोडक म्हणाले की, देश निष्ठेच्या भावनेने माजी सैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. सैनिक देशाची शान तर माजी सैनिक वैभव आहे. सामाजिक उपक्रमासह पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने फांडेशनने चालू असलेला वृक्षरोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब करपे, निवृत्ती भाबड, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, संभाजी वांढेकर, गोविंद वाडेकर, गोकुळ पवार, आबासाहेब साळवे, अनिल पालवे, गणेश पालवे, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, विष्णू बुधवंत, बाळासाहेब बोठे, दादासाहेब पठाण, सोमनाथ घोंगडे, जर्नादन कोकाटे, महादेव शिरसाठ, आकाश औटी, जर्नादन जायभाये, चंपती मोरे, दारूणकर, सरोदे, दिलिप कापसे, अप्पा शिकेतोड, सुभाष निंबाळकर, मयुर नवगिरे, रामकृष्ण काकडे आदि माजी सैनिकांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आभार  बन्सी दारकुंडे व विठ्ठल लगड यांनी मानले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget