DNA Live24 2015

सामाजिक भान जपत उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव


अहमदनगर :
उत्सवाच्या माध्‍यमातून सामाजिक बांधिलकी जपण्‍याचे कौतुकास्‍पद काम होते आहे. एक गाव एक गणपती ही संकल्‍पना अनेक गणेश मंडळांनी राबविली. अनेक मंडळांनी आपल्‍या कार्यातून आदर्श उभा केला. सामाजिक भान जपत उत्सव साजरा कऱण्याची आपली परंपरा आहे. अशा गणेश मंडळांनी ती पुढे नेण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्गार राज्‍याचे मृद व जलसंधारणराजशिष्टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी काढले. यावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र येत आहेत.  हे दोन्ही सण शांततेत साजरे करुन आपण सामाजिक सौहार्दाची ही भावना अधिक पुढे नेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पोलिस मुख्‍यालय येथील जिल्‍हयातील 2017 मध्‍ये गणेश उत्‍सव कालावधीत उत्‍कृष्‍टरित्‍या गणेश उत्‍सव साजरा करणा-या मंडळांचा गौरव तसेच पोलीस क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदमखासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्‍हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना, रोहिदास पवार, पोलिस उप अधीक्षक  संदीप मिटके व अरुण जगताप आदि उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणालेअहमदनगर जिल्‍हयाला गणेश उत्‍सव व मोहरम उत्‍सवाची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत यंदाचा उत्‍सवही शांततेत साजरा करावा यासाठी प्रत्‍येक गणेश मंडळाने पुढाकार घ्‍यावा. एकत्रित सण उत्‍सव साजरा करण्‍याची जिल्‍हयाची परंपरा कायम ठेवावी. जिल्‍हयातील कायदा व सुव्‍यवस्‍था अबादीत राहण्‍यासाठी प्रत्‍येकाने सहकार्य करावे. पोलिस प्रशासन आपल्‍या संरक्षणासाठी आहे. त्‍यांना सहकार्य करण्‍याची आपली प्रत्‍येकाची जबाबदारी असल्‍याचे त्‍यानी सांगितले. खासदार दिलीप गांधी म्‍हणाले, अहमदनगरचा  मोहरम उत्‍सव देशात प्रसिध्‍द आहे. तर गणेश उत्‍सवाची जिल्‍हयाला मोठी परंपरा आहे. दोन्‍ही उत्‍सव एकत्रितपणे साजरे करुन जिल्‍हयाचा लौकिक वाढविण्‍यासाठी  प्रत्‍येकाने या उत्‍सवात सहभागी व्‍हावे.

जिल्‍हाधिकारी श्री द्विवेदी म्‍हणाले, गणेश व मोहरम उत्‍सव शांततेत साजरा करण्‍यासाठी प्रत्‍येकाचे योगदान महत्‍वाचे ठरणार आहे.  यासाठी प्रशासन व जनता यांचा  समन्‍वय महत्‍वाचा आहे. जिल्‍हा पेालिस अधीक्षक श्री. शर्मा म्‍हणाले, सुपा गावाने एक गाव एक गणपती ही संकल्‍पना राबवून आदर्श निर्माण केला. जिल्‍हयातील प्रत्‍येक गावाने एक गाव एक गणपती ही संकल्‍पना राबविण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. यावेळी 2017 मध्‍ये उत्‍कृष्‍टरित्‍या गणेश उत्‍सव साजरा करणा-या जिल्‍हयातील  मंडळांचा गौरव करण्‍यात आला. या मध्‍ये एक गाव एक गणपती सुपा ता. पारनेर यांना प्रथम, महाराणा प्रताप युवक मंडळ संगमनेर यांना द्वितीय तर गुरुवार क्‍लब गणेश मंडळ कर्जत यांन तृतीय क्रमांकाने गौरविण्‍यात आले. यावेळी शांतता कमिटीचे सदस्‍य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, जिल्‍हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी, व जिल्‍हयातील गणेश मंडळाचे अध्‍यक्ष सदस्‍य उपस्थित होते. अहमदनगर जिल्‍हा पोलिस क्रीडा स्‍पर्धेचा समारोप यावेळी करण्‍यात आला. या स्‍पर्धेतील यशस्‍वी पोलिस खेळाडूंचा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget