DNA Live24 2015

आता डिजिटल मोडनुसार कायदेशीर नोटीस..!

पुणे :
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, त्यातील समस्या लक्षात घेऊन यापुढे डिजिटल मोडनुसार (व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, ई-मेल) नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. विद्युत नियामक आयोगाने यास परवानगी दिली आहे.

आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्तावाच्या निकालानुसार महावितरणला थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार नोटीस पाठविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे. कंपनीने ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. आतापर्यंत २ कोटी ५ लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. त्यानुसार ग्राहकांना वीजपुरवठा व विजविषयक विविध बाबींची माहिती महावितरणतर्फे देण्यात येत आहे. आता याद्वारेच नोटीसही पाठविली जाणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget