DNA Live24 2015

शासन एक हजार इलेक्ट्रिक वाहने घेणारमुंबई :
भारत सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच इलेक्ट्रिक कारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजीराव पाटील -निलंगेकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रवीण पोटे पाटील, प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अजित सगणे, ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार आदी उपस्थित होते.

यानिमित्ताने मंत्रालयामधे दोन चार्जिंग स्टेशन्स बसविण्यात आले असून नागपूरमध्ये दोन चार्जर्स बसविण्यात येणार आहेत. याद्वारे, राज्यातील ई-मोबिलिटीला उत्तेजन मिळावे यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. पाच मोटार इलेक्ट्रिक कार हा पहिला संच असून पुढील काळात ईईएसएलकडून टप्प्याटप्प्याने राज्य शासन एक हजार इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेणार आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ईईएसएल यांच्यात 3 मे 2018 रोजी इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेणे आणि राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये ईव्ही चार्जर्स स्थापन करण्यासंबंधी सामंजस्य करार झाला. तसेच महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने तसेच त्याच्या सुट्या भागांची निर्मिती, जोडणी उद्योग व चार्जिंग साधनांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार हा करार करण्यात आला होता. इलेक्ट्रिक वाहनांसाठी महाराष्ट्र राज्य हे जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठिकाण ठरावे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करत त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्यासाठीच्या सुट्या भागांच्या उत्पादनालाही चालना मिळावी, या हेतूने या वर्षी राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित पायाभूत सुविधा धोरण जाहीर केले होते.

केंद्र सरकारचे ई-मोबिलिटी व्हिजन सक्षम करण्याच्या दृष्टीने, सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये वापरली जाणारी पाच लाख पेट्रोल/डिझेलवरील वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या राज्यांमध्ये ईलेक्ट्रिक वाहने तैनात करण्यात आली आहेत, तिथे ईईएसएलने चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधाही स्थापित केल्या आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget