DNA Live24 2015

शिक्षकांचे योगदान महत्वाचे : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : शिक्षक हे राष्ट्राच्या निर्माणात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात असे, प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यैंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारच्या सोहळयात केले. यावेळी महाराष्ट्रातील विक्रम अडसूळ या प्राथमिक शिक्षकास ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने’ उपराष्ट्रपती यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2017’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपराष्ट्रपती, केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्य बळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव लीना रे उपस्थित होते. 

राष्ट्रपती म्हणाले, चांगल्या शिक्षकांमुळेच शिक्षण क्षेत्रात भारत उत्कृष्टतेकडे वाटचाल करीत आहे. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी शिक्षकांना आज पुरस्कृत केले जात आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बजावलेली भुमिका सर्वांना माहिती व्हावे यासाठी शासन उपक्रम राबवीत असल्याचेही सांगितले. एकेकाळी भारताची ओळख ही विश्व गुरू म्हणुन होती. भारताने जगाला अनेक बुध्दीवंत दिले आहेत. वर्तमानात विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन शिक्षकांसमोर असल्याचे राष्ट्रपतींनी म्हणाले.

सामाजिक मानसिकता बदलविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे सांगुण उपराष्ट्रपती म्हणाले,   नौतिकता आणि मुल्य हे शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्याचे महत्वपुर्ण काम शिक्षकांनी केले  पाहिजे. मातृभाषेत प्राथमिक शिक्षण  देण्यात यावे, अशी सूचनाही उपराष्ट्रपती यांनी  यावेळी केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री जावडेकर यांनी मंत्रालयाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. तसेच राष्ट्रीय पुरस्कारात करण्यात आलेल्या बदलांविषयी सांगितले.

यावर्षी केंद्रीय मनुष्य बळ मंत्रालयातर्फे नवीन मार्गदर्शीका जाहीर झालेली आहे. त्यातंर्गत   देशभरातील एकूण 45 शिक्षकांना यावर्षी  पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासाठी एक समिती बनविण्यात आली होती. पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे.   

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणा-या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले श्री विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी महाराष्ट्रातुन करण्यात आलेली आहे. श्री अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. आपल्या शिक्षकी जीवनात नवनवीन उपक्रम राबवून शालेय शिक्षण अभ्यासक्रमाला नवी दिशा दिलेली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री अडसूळ यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, ‘या वर्षीची राष्ट्रीय शिक्षक  पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अधिक पारदर्शक होती’. सहशिक्षकांच्या मदतीनेच शाळेत नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले आणि त्यामुळेच आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशी प्रतिक्रीया श्री अडसूळ यांनी दिली.

बंडगरवस्तीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा कायापालट

जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेल्या बदलांविषयी सांगताना श्री अडसूळ म्हणाले, शिक्षणाचे महत्व स्थानिकांना पटवून लोकसहभागातून शाळेला लॅपटॉप, संगणक उपलब्ध करून दिलेले आहे. मुलांना आंनदी वातावरणात शिकविले पाहिजे त्यासाठी शाळेमध्ये आनंदी शिक्षण असा उपक्रम राबविला याअतंर्गत नाटकाच्या माध्यमातून अभ्यास शिकविला जातो. मुलांनाच पात्र निवडायला सांगितले जाते, लिहायला प्रोत्साहीत केले जाते.

यासोबतच व्हिडीओ तसेच ऑडीयोची निर्मिती करूनही विद्यार्थ्यांना शिकविले जाते. यु-टयूब, फेसबूकवर अभ्यासाला पूरक असणारे चांगले व्हिडीयो विद्यार्थ्यांना दाखविले जातात. राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय बांधणीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्नांमध्ये शाळेत गणतंत्रदिन, स्वातंत्र दिनासोबतच, रक्षा बंधन, ईद, दिवाळी असे सर्वच सण साजरे केले जातात.

नगरपंचायत, पोलीस स्थानके, न्यायालय येथे विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातात. सीमेवरच्या सैनिकांना बंडगरवस्तीतील जिल्हा परिषदेच्या शाळेने राखी पाठवलेल्या आहेत. यासह जेव्हा सैनिक सुट्टयांवर येतात तेव्हा ‘सैनिक आपल्या भेटीला’ असा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांमध्ये स्वजागृती व्हावी यासाठी कडक मुलाखती, बाहूली नाटयाच्या माध्यमातूनही शिकविले जाते. तसेच रचनावादी साहित्याचा वापर करून शिकविले जाते. दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा ठेवली आहे या दिवशी शैक्षणीक साहित्य बनविण्याचा उपक्रम राबविला जातो. हे बनविलेले साहित्य जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यकमांमध्ये स्टॉल लावून विकल्या जाते.  राज्य शासनाच्या शिक्षण वारी या उपक्रमात बंडगरवारी या शाळेचा सहभाग 2016 मध्ये होता.  असे वैविध्यपूर्ण उपक्रम हे बंडगरवस्तीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे श्री अडसूळ यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget