DNA Live24 2015

विमानातील 'तो' फोटो होतोय जोरात व्हायरल...

गावाकडच्या माणसांची बसण्याची एक खास स्टाईल असते. त्याची ती स्टाईल तो शक्यतो सोडत नाही. अशीच स्टाईल कायम ठेवून विमानात बसलेल्या एकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

विमानात बसण्याचे एक शास्त्र आहे. त्यालाच धाब्यावर बसवून एक युवक गावरान स्टाईलने विमानात एक पाय खुर्चीवर घेऊन बसल्याचा हा फोटो आहे. सीटबेल्ट न लावता विमानाच्या खिडकीतून खालचे जग मनोभावे न्याहाळत मज्जा लुटणारा हा तरुण अनेकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.

विविध ग्रुपवर या फोटोचा बोलबाला आहे. शेतकरी आणि गावठी स्टाईलचा हा तरुण कोणत्या जिल्ह्याचा व तालुक्याचा असेल, असे विचारून ही पोस्ट जोरात शेअर होत आहे. गावरान गोष्टी अजूनही कौतुकाचा विषय असल्याची साक्ष यानिमित्ताने पुन्हा एकदा आली आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget