DNA Live24 2015

इतरांसह भाजपनेही आणले नाही ‘अच्छे दिन’ : नारायण राणे


सिंधुदुर्ग :
राज्यातील पाचही प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीरनामे व वचननामे यातून भरघोस अशावासाने दिली. मात्र, तरीही ‘अच्छे दिन’ काही आले नाहीत. रोजगार मिळाले नसतानाच महागाई वाढली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्र स्वाभिमान  पक्ष जनतेच्या कल्याणासाठी सक्रीय राजकारण करणार असल्याचे खासदार आणि पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद  नोंदणी शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब ,महिला अध्यक्षा प्रणिता पाताडे ,संदीप कुडतरकर, शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर ,प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर ,गीता परब, अन्वर खान आधी उपस्थित होते. ते म्हणाले की, राज्यात पाच राजकीय पक्ष आहेत ते निवडणूकात जाहीरनामे-वचननामे देतात, पण त्याची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे अच्छे दिन आले नाहीत. एक कोटी नोकऱ्याही लागल्या नाहीत, पेट्रोल डिझेल कमी झालं  नाही किंवा पंधरा लाख बँक अकाऊंटमध्ये जमा देखील झालेली नाहीत, हे ध्यानात घेऊन स्वाभिमान पक्ष यापेक्षा वेगळा आहे हे जनतेला दाखवून द्या आणि पुढील निवडणुकात विजय मिळवा.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget