DNA Live24 2015

कपाशीच्या या जातीची शेतकऱ्यांना पडली भुरळ..!

सोशल मीडियाच्या शेतकरी जगतात सध्या एक फोटो धुमाकूळ घालीत आहे. कपाशीच्या एकाच झाडाला शेकडो बोन्डे लगडलेली असलेला हा फोटो अनेकांचे आकर्षण ठरत आहे. बोंडअळीसह बीटी कपाशीवर येणारे कीडरोग चर्चेत असतानाच ही नवी जात व्हायरल झाल्याने अनेकांनी या कपाशीच्या जातीच्या बियाण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अधिक माहिती घेतली असता हा फोटोशॉप इमेजचा प्रकार असल्याचीच शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सध्या फोटोशॉपच्या जगातून नागरिकांना फसविण्याचा मोठा उद्योग तेजीत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरू असलेली ही अविचारी कीड आता शेती क्षेत्रातही घुसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. कपाशीच्या या फोटोकडे पाहताक्षणी शेती म्हणजे श्रीमंतीकडे नेणारा व्यवसाय, असाच फील येतो. कारण एका बियाण्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाल्यास हमखास नफा व श्रीमंती ठरलेली. हाच विचार करून तरुणाई या नव्या जातीच्या कपाशीच्या प्रेमात पडली आहे. पाहताक्षणी मोहून टाकणारे हे फोटो आहेत. त्यामुळे फेसबुकवरील 'शेती व जोडधंदा' या ग्रुपसह अनेक ग्रुप व पेजेसवर हे फोटो झळकत आहेत.

हेच फोटो पाहून मलाही कुतूहल वाटले. कपाशीची ही कोणती जात आली आहे, असे वाटल्याने काही कृषी अधिकारी व शेती संशोधकांना हे फोटो पाठवून दिले. त्यावर त्यांनी अशी कोणतीही जात माहितीत नसल्याचे सांगून हे फोटोशॉप जगतातले नवे आपत्य असल्याची शंका व्यक्त केली. मलाही याबद्दल नेमके माहित नसून, कोणालाही काही माहिती (पुराव्यासह) असल्यास संपर्क करावा.

- सचिन चोभे,
संपादक, कृषिरंग
मो. ९४२२४६२००३

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget