DNA Live24 2015

आजपासून राज्यभरातील प्राध्यापक बेमुदत संपावर

पुणे :
विविध प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आता राज्यातील प्राध्यापक आक्रमक झाले आहेत. त्यानुसार राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातीलप्राध्यापक विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. २५ सप्टेंबर) पासून बेमुदत संप पुकारला आहे.

महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, अभ्यास मंडळांमधील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ दूर करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकित ७१ दिवसांचे वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. यासाठी सर्व प्राध्यापक संघटना एक होऊन लढ्यात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

एमपुक्टो संघटनेच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांनी राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपात शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी व्यक्त केला. यापूर्वी संघटनेकडून ७१ दिवसांचा बेमुदत संप केला होता, त्यावेळी त्याला कमी पाठिंबा मिळाला होता. त्याचबरोबर शासनाने त्या ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना अदा केले नव्हते, त्यामुळे काही प्राध्यापक या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget