DNA Live24 2015

घरगुती उपकरणाने बनविले पोल्ट्री फार्मिंगसाठी ईलेक्ट्रीक ब्रुडर


कुक्कुटपालन शेड चालवताना अनेकदा पिलांच्या मरतुकीने शेतकरी वैतागतात. पिलांना पहिल्या वाढीच्या कालावधीत सुयोग्य तापमान न मिळाल्याने मरतुक वाढते. दहा वर्षांपासून घरगुतीरित्या पाच हजार पिलांचे संगोपन करताना आलेल्या अनुभवातून इसळक (ता./जि. अहमदनगर) येथील प्रगतशील शेतकरी प्रविण खपके यांनी प्रयोगाअंती ईलेक्ट्रिक ब्रुडर तयार केले आहे.

नगर शहरातील औद्योगिक वसाहतीनजीकच्या गावातील साडेदहा एकर शेतावर खपके यांचे फार्महाऊस आहे. 15 वर्षांपासून घराजवळील पाच हजार पिलांच्या कुक्कुट शेडमध्ये त्यांच्यासह कुटुंबिय कोबड्यांचे संगोपन करतात. मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका घेतल्यांनतर त्यांनी एमआयडीसीत हार्डवेअरचे दुकान थाटले. मात्र, शेती व कोंबडीपालनाची आवड असल्याने त्यांनी पोल्ट्री फार्म सुरू केला. ब्रॉयलर पिलांच्या संगोपनासाठी सुरूवातीच्या 7 दिवसांत पाट्यांमध्ये 100 वॅटचे चार बल्ब लावून 33 अंश सेल्सिंअसचे तापमान ठेवावे लागते. याच तापमानात पिलांची निरोगी वाढ होते. तर ब्रॉयलरप्रमाणेच गावरान कोंबडीच्या पिलांना 21 दिवस तर र्होड आयलंड रेडच्या पिलांसाठी हाच ब्रुडिंग कालावधी 14 दिवसांचा असतो. याच काळात येणार्या मरतुकीने पोल्ट्रीचालकांना फटका बसतो.

परंपरागत वापरल्या जाणार्या सरपण जाळणे किंवा पाट्यांच्या ब्रुडिंगमधून फक्त 7 टक्क्यांपर्यंतच उष्णता अर्थात ऊब पिलांना मिळते. याव्दारे मोठ्या प्रमाणात उष्णता पाट्यांमधून वर जाते. परिणामी पिलांना ऊबीसाठी एकमेकांत घुसावे लागते. यामुळे पिले आक्रमक होऊन मरतुक वाढते. ऊब व पोषक वातावरणाअभावी पिलांचे खाण्या-पिण्याकडेही दुर्लक्ष होते. तर सरपणाच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होत असतानाच पिलांमध्ये श्वसनसंस्था व डोळ्यांचे विकारही उद्भवतात. पोषक वातावरणातच ब्रॉयलर पिले पाणी पिऊन खातात, असा खपके यांचा अनुभव आहे. दहा वर्षांत अनेकदा पिले गाउट अर्थात डिहायड्रेशनने मेल्याने खपके  कुटुंबियांनाही अनेकदा पदरी तोटा पडला.

याच अनुभवाच्या शिदोरीवर चार महिन्यांपूर्वी खपके यांनी त्यांच्या फोनिक्स इंजिनिअर अॅण्ड फॅब्रिकेटर्स या फर्ममध्ये प्रयोगांतून ईलेक्ट्रिक ब्रुडर बनविले. त्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, अनेकदा थंडीत पक्षीत पक्षी गाउटमध्ये गेल्याने झालेल्या मरतुकीतून तोटा झाला. अभिषेक हॅचरिजचे संचालक दिलीप जासूद यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अशा ईलेक्टिक ब्रुडरची संकल्पना ओझरती मांडली. बाजारात याचा शोध घेतला. असे ब्रुडर उपलब्ध नसल्याने मग त्यावर हार्डवेअरच्या फर्ममध्ये वर्षभरापूर्वी प्रयोगांना सुरूवात केली. अखेर चार महिन्यांपूर्वी असे ब्रुडिंग यंत्र तयार करण्यात यश आले.

ब्रुडिंग यंत्राचे विशेष2 किलोवॅटची ईलेक्ट्रिक क्वाईल असलेल्या या यंत्रात तापमान नियंत्रित करण्यासाठी सोय आहे. सुमारे 95 टक्क्यांपर्यंत उष्णतेचा वापर करता येत असलेले एक ब्रुडर 1000 ते 1200 पिलांचे ब्रुडिंग करते. प्रकाशासाठी यात फक्त 50 वॅटचा एक बल्ब असून, अतिप्रकाश व धुरापासून पिलांचे संरक्षण होते.

संपर्क :
प्रविण खपके
इसळक, ता. नगर, जि. अहमदनगर.
मोफोन888813770

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget