DNA Live24 2015

महानिर्मितीच्या कोराडी तलाव संवर्धनास मान्यता

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जलपरिसंस्थेच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय योजनेंतर्गत (National Plan for Conservation of Aquatic Eco-systemsNPCA) नागपूर जवळील महानिर्मितीच्या (महाजेनको) कोराडी तलावाचे संवर्धन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शहरी व निमशहरी भागातील तलावांच्या संवर्धनासह प्रदूषित तलावांचे व्यवस्थापन करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे

तलावांचे शाश्वत व्यवस्थापन व संवर्धन करण्यास राज्य शासनास प्रोत्साहित व मदत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या खर्चात केंद्रीय पर्यावरणवने व जलवायू परिवर्तन मंत्रालय आणि महानिर्मितीचा वाटा 60:40 असा राहणार आहे. या योजनेत तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापन,  तलावांचे योग्य व्यवस्थापन, तलावांच्या परिसरात वृक्षारोपण, बांध मजबुतीकरण, तलावाच्या प्रथमदर्शनी भागासह सार्वजनिक जागांचा विकास, जलजागृतीसाठी उपक्रमांचे आयोजन आदींचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत एकूण 26 कोटी 21 लाखाचा भार केंद्र सरकार उचलणार असून त्यापैकी 8 कोटी 74 लाख 39 हजार 600 रुपयांचा पहिला हप्ता राज्यास वितरित केला आहे. तसेच महानिर्मिती कंपनीच्या १७ कोटी ४८ लाख रुपयांच्या हिश्शातील  तीन कोटी ४९ लाख ७५ हजार ८४० रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यासही आज मान्यता देण्यात आली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget