DNA Live24 2015

रोहयोतील अपूर्ण कामे पूर्ण करा : पालकमंत्री प्रा. शिंदे


अहमदनगर :
रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक विभागाने त्यांच्याकडे असणाऱ्या अपूर्ण कामांची सविस्तर यादी बनवून ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना राज्‍याचे मृद व जलसंधारणराजशिष्टाचारविमुक्‍त जातीभटक्‍या जमातीइतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिल्या. जी कामे 10 टक्क्यांपेक्षा कमी झालेली असतील, ती त्यावेळीच यादीतून वगळली गेली पाहिजे होती. त्यामुळे अद्यावत यादी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. समितीचे सहअध्यक्ष शिवाजीराव अनभुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदींसह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जिल्ह्यातील मजूर उपस्थिती, सुरु असलेली कामे, शेल्फवरील कामे आणि सध्याची कामांची स्थिती आदींचा आढावा घेतला. जिल्ह्यात सध्या 1 हजार 729 कामे सुरु असून त्यावर 7 हजार 246 मजूर उपस्थिती आहे. विशेषता घरकूल आणि दुतर्फा वृक्ष लागवड, फळबाग लागवड, तुती लागवड, शेततळे, विहिरी, शौचालय, रोपवाटिका आदी कामांवर हे मजूर असल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाने दिली.

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर सन 2018-19 मध्ये आतापर्यंत 26 कोटी 96 लाख रुपये खर्च झाला आहे. यात अकुशल खर्च हा 18 कोटी 39 लाख रुपये तर कुशल खर्च 7 कोटीहून अधिक झाल्याची माहिती त्यांनी दिली. कामांचे जिओ टॅगिंग करण्यात अजूनही यंत्रणा मागे आहे. पूर्ण झालेल्या कामांचे जिओटॅंगिग झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. रोजगार हमी योजनेंतर्गत कामावर येत असलेल्या मजुरांची बॅंक खाती आधारशी लिंक करण्यासंदर्भात अधिक गतीने काम होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात नरेगा अंतर्गत अपूर्ण विहिरी पूर्ण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने दिनांक 1 एप्रिल ते 30 जून 2018 या कालावधीत मोहिम राबवून 512 विहिरी पूर्ण करण्यात आल्या. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना-अहिल्यादेवी सिंचन विहिर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 631 कामे सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

धरणाच्या कमांड क्षेत्रात अनेक ठिकाणी गावांमध्ये पाणी पोहोचत नाही, तसेच ज्याठिकाणी डार्क झोन  जाहीर केले होते तेथेही विहिरींना परवानगी नाही. मात्र, मागील काही वर्षात जलयुक्त शिवार व अन्य जलसंधारण कामांमुळे अनेक गावांचा जलस्तर वाढला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून याबाबतची अद्यावत माहिती घेऊन संबंधित गावांत विहीरींची कामे घेता येतील का, हे तपासावे, अशा सूचना पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी दिल्या. शेतरस्ते तसेच पाणंद रस्ते योजनेसंदर्भात आठ दिवसांत सर्व प्रस्तावांची छाननी करुन  योग्य त्या प्रस्तावांना मंजुरी देऊन कामे सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget