DNA Live24 2015

पावसाचा कहर; १० ठार

नवी दिल्ली :
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग वगळता इतर भागात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. तर, उत्तर भारतात अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने सोमवारी हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंडसह उत्तर भारतातील राज्यांना झोडपून काढले. या राज्यांतील विविध दुर्घटनांत १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला.

उत्तर भारतात नद्यांना पूर आला आहे. दरडी कोसळल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काश्मिरातील कठुआ जिल्ह्यात पावसामुळे दरड कोसळून घर गाडले गेले. यात एकाच कुटुंबातील ३ मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी विक्रमी बर्फवृष्टी झाली. यामुळे रस्ते बंद होऊन शेेकडो पर्यटक अडकले. राज्यात विविध घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिरात शाळांना सुटी देण्यात आली आहे. उत्तराखंडात अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. पंजाब आणि हरियाणात खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget