DNA Live24 2015

नगरमध्ये शनिवारी कृषी प्रबोधन मेळावा


हणमंतराव गायकवाड, पोपट पवार, लक्ष्मीकांत कोर्टीकर, प्रशांत नाईकवाडी, महेश कडूस हे करणार मार्गदर्शन
अहमदनगर :
शेतीचा खर्च कमी करण्यासह उत्पादनवाढीचे नियोजन करूनच शेती नफ्यात येऊ शकते. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हाच एकमेव पर्याय असल्याने त्यावर प्रबोधन करण्याच्या हेतूने शनिवारी (दि. १५ सप्टेंबर) नगरमध्ये कृषी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या मेळाव्यात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रक्षित ऑरगॅनिक्स या संस्थेच्या संचालिका अमिता दसरे व जयादेवी मेढे यांनी केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शनिवारी दुपारी टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे हा कृषी प्रबोधन मेळावा होत आहे. या मेळाव्यात ‘विषमुक्त शेती व निरोगी भारत’ या विषयावर बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष श्री. पोपट पवार, ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ श्री. लक्ष्मीकांत कोर्टीकर, सेंद्रिय शेती विषयाचे अभ्यासक श्री. प्रशांत नाईकवाडी, कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष श्री. महेश कडूस हे आधुनिक शेती तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक शेती या विषयावर मार्गदर्शन करतील. यावेळी पंचायत समिती सभापती श्री. रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य श्री. सचिन जगताप, डॉ. दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. युनुसभाई तांबटकर, उद्योजक श्री. खेताराम चौधरी, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री. रा. वि. शिंदे यांच्यासह मान्यवर व नगर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी खुला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget