DNA Live24 2015

आधुनिक वैद्यकीय सोयीसुविधांच्‍या उपलब्‍धतेसाठी प्रयत्‍नशील : पालकमंत्री शिंदे

अहमदनगर :
केंद्र व राज्‍य शासनाच्‍या अनेक योजनांच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य सेवा पुरविल्‍या जातात. जिहयातही अत्‍याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधांच्‍या  उपलब्‍धतेसाठी  आवश्‍यक  निधीसाठी आपण प्रयत्नशील असल्‍याचे सांगतानाच कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍याने सेवेच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयात नावलौकिक मिळविला असल्‍याचे गौरवोद्गगार राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे  यांनी  काढले.

महानगरपालिकेच्‍या कै. बाळासाहेब देशपांडे  दवाखान्‍याच्‍या रक्‍तपेढीतील रक्‍तविघटन प्रयोग शाळेचे उदघाटन व लोकार्पण पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, नगरसेवक बाबासाहेब वाकडे, सुवेंद्र गांधी, सुनिता भिंगारदिवे, अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे, उपायुक्‍त प्रदीप पठारे, उप विभागीय अधिकारी उज्‍वला गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, रुग्‍णसेवेच्‍या माध्‍यमातून कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍याचा  जिल्‍हयात नावलौकिक आहे. गोरगरीब, मध्‍यमवर्गीय व सर्वांनाच दवाखान्‍यातील सोईसुविधांचा लाभ होत आहे. दवाखान्‍यासाठी आवश्‍यक सोईसुविधासोबतच नुतनीकरणासाठी लागणा-या निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करणार असल्‍याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्‍हा मध्‍यवर्ती असल्‍याने लगतच्‍या जिल्‍हयातूनही अनेक रुग्‍ण उपचारासाठी येथे येतात. त्‍यादृष्‍टीने जिल्‍हयात वैद्यकीय सोयीसुविधांच्‍या उपलब्‍धतेसाठी आपण प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मार्गदर्शनाने "आयुषमान भारत"  योजनेचा लवकरच शुभारंभ होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या रक्‍तविघटन प्रयोग शाळेचा रुग्‍णांना नक्‍कीच लाभ होईल असा विश्‍वास प्रा. शिंदे यांनी व्‍यक्‍त केला.

खासदार दिलीप गांधी म्‍हणाले, महात्‍मा फुले जीवनदायी योजना, मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी व इतर अनेक योजनांच्‍या माध्‍यमातून अनेक कुटूंबांना वैद्यकीय मदत मिळत आहे. कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍याची जिल्‍हयात वेगळी ओळख आहे. रुग्‍ण सेवेतून निर्माण झालेली ओळख भविष्‍यातही कायम राहील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी म्‍हणाले, कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍याने वैद्यकीय सेवेतून आपली ओळख कायम ठेवली आहे. जिल्‍हयाच्‍या दृष्‍टीने ही भूषणावह बाब आहे. जिल्‍हयातील अनेक महिलांना या दवाखान्‍याचा चांगला लाभ झाला आहे.  यापुढेही रुग्‍णांना वैद्यकीय सुविधा अधिकाधिक चांगल्‍या पध्‍दतीने देण्‍यावर आमचा भर राहील. सोईसुविधेसोबत नुतनीकरणाचे कामही लवकरच सुरु होईल. रुग्‍णालयाने  रक्‍तविघटन प्रयोगशाळा कमी कालावधीत सुरु केली असून या प्रयोगशाळेचा रुग्‍णांना जास्‍तीत जास्‍त लाभ होईल, असे त्‍यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक, अधिकारी व नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget