DNA Live24 2015

रयत सेवक मित्र मंडळाचा रविवारी एल्गार मेळावा

अहमदनगर :
रयत सेवक मित्र मंडळाचा रविवार दि.9 सप्टेंबर रोजी माध्यमिक शिक्षक बँक येथे एल्गार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती उत्तर विभाग समन्वयक अनुसंगम शिंदे यांनी दिली. या मेळाव्यात बदली संदर्भात योग्य नियमावली, सेवाजेष्ठतेनुसार बढती, जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा निधी, देणग्या, बदल्यात बोकाळलेला घोडेबाजार, हक्कांसाठी न्यायालयीन लढा, कला शिक्षकांचे प्रश्‍न, रयत सेवक बँकेची निवडणूक या विषयांवर चर्चा होणार आहे.

या मेळाव्यासाठी रयत सेवक मित्र मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील सर्व पदवीधर डी.एड.सक्रिय कार्यकर्ते, कायद्याचे अभ्यासक आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त रयत सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रयत मित्र मंडळाचे अध्यक्ष रामनाथ काळे, सचिव नंदकिशोर गायकवाड, पिलगर सर, सुहास भावसार, आशालता शिंदे, सविंद्रा कोकाटे यांनी केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget