DNA Live24 2015

दूधपित्या चिमुरड्याचा हा फोटो आवडतोय सर्वांना..!


पुणे :
शेतकरी म्हणजे बापुडा बिचारा, अशीच अंधश्रद्धा आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यात शेतकरी मेटाकुटीला आल्याने हे सत्य कोणीही नाकारणार नाही. मात्र, आनंदी, सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जीवन फक्त शेतकरी कुटुंबातच मिळू शकते. त्याचीच झलक दाखविणारा दूधपित्या चिमुरड्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार धुमाकूळ घालीत आहे.

शेतीविषयक माहिती देणाऱ्या किंवा चर्चा करण्यासाठी बनविलेल्या फेसबुक पेज आणि व्हाट्सएप्प ग्रुप यावर हा फोटो जोरात शेअर होत आहे. शेतकऱ्याच्या घरातील चिमुरडा कसा मस्तपैकी दूध पितोय, याचे हे बोलके छायाचित्र आहे. अगदी निराश्या दुधाच्या बदलीलाच तोंड लावून दूध पिणारा हा चिमुरडा सर्वांना खूप आवडत आहे. गाव सोडू शहरांत आलेल्या अनेकांना यातून आपलेही बालपण आठवत आहे. हा फोटो नेमका कुठला आहे, याबद्दल काहीच माहिती नसतानाही 'हे सुख फक्त शेतकऱ्याच्या मुलाच्याच नशीबात आहे...' ही ओळ टाकून हा फोटो जोरात शेअर होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget