DNA Live24 2015

हिवरे बाजार गाव स्वच्छतेत पहिले

अहमदनगर :
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत दोन्ही पुरस्कारावर हिवरे बाजार (ता. नगर) गावाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नाशिक विभागात आदर्शगाव हिवरेबाजार प्रथम आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत २५ लाख तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये १० लाखांचे बक्षीस असे एकून ३५ लाख रूपयांचा पुरस्कार हिवरे बाजार गावाला मिळाला आहे. आदर्शगाव हिवरेबाजारने स्वच्छतेची गरज व त्यातील सातत्य टिकवून ठेवले आहे. १९९२मध्ये ग्राम अभियानात विभागात प्रथम येऊन याची सुरुवात झाली होती. त्यानंतर २००० मध्ये दिवंगत ग्रामविकास मंत्री आर.आर.पाटील यांच्या कल्पनेतून संत गाडगेबाबा अभियान सुरू झाले. त्यात प्रथमच भाग घेताना हिवरे बाजार जिल्ह्यामध्ये प्रथम आले होते. त्यावेळेस गावाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर या अभियानात भाग न घेता गाव स्वच्छ ठेवण्याबाबत मात्र गावकऱ्यांनी सातत्य ठेवले होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget