DNA Live24 2015

ग्रामविकास | जमगाव झाले पेपरलेस..!

पारनेर :
तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान जामगाव गावाने पटकावला आहे. यापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार असल्याने ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे.

ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांचे वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी दिली.
ग्रामपंचायत पेपरलेस झाल्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली आपले सरकार सेवा केंद्राअंगतर्गत ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रवीण मुंजाळ, लिपीक सुदर्शन खामकर यांचे सहकार्याने सर्व दप्तर ऑनलाईन केलेले आहे. आता येथील नागरिकांना ग्रामपंचायतीमधून सर्व कागदपत्रे ऑनलाईन संगणिकृत मिळणार आहेत. पारनेर तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत झाली आहे. याआधी या ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियानात बक्षिसे मिळवली आहेत. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget