DNA Live24 2015

विषमुक्त शेती हाच महत्त्वाचा पर्याय : महसूलमंत्री पाटील


शिर्डी : 
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी झिरो बजेटमध्ये नैसर्गिक विषमुक्त शेती हाच महत्त्वाचा पर्याय असू शकतो. शेती क्षेत्रासमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता, सध्या झिरो बजेटवर आधारीत नैसर्गिक शेती करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री. साईबाबा संस्थान विश्वस् व्यवस्थेच्या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती तसेच विषमुक्त शेतीया प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमाप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, पद्यश्री सुभाष पाळेकर, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेती हा विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू असल्याने शेतीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन सर्वतोपरी कटिबद्ध आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी गेल्या चार वर्षात शासनाने विविध कृषि योजना राबविल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर कृषि विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करावे. आज शेतीत नव-नवे प्रयोग केले जात आहेत. त्याचा अभिमान आहेच, परंतु त्यातून जास्तीत-जास्त रोजगार निर्मिती करण्याची सध्या आवश्यकता आहे. त्यासाठी युवकांना शेतीकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. आज मोठ्या प्रमाणात शेतीत रासायनिक खते किटक नाशक औषधांचा सरास वापर केला जात असल्याने जमिनीचा पोत कमी होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget