DNA Live24 2015

पत्रकारांना वाटप करण्यात येणार्‍या टी शर्टचे अनावरण

अहमदनगर :
पत्रकारांसाठी कार्यरत राहून सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणारी उपक्रमशील संस्था म्हणून नगर शहर प्रेस क्लबची ओळख आहे. मोहरम व गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पत्रकारांना टी शर्ट देण्याबरोबरच संवेदनशीलपणे विसर्जन मिरवणुकीत काही दुखापत झाल्यास प्राथमिक उपचार करता यावा या उद्देशाने औषधी किटची व्यवस्था प्रेस क्लबने केली आहे. पोलीस, पत्रकार व सुजाण नागरिकांच्या प्रयत्नातून मोहरम व गणेशोत्सव शांततेत सद्भावाने पार पडतील असा विश्‍वास जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केला.
यावर्षी एकत्र आलेल्या मोहरम व गणेशोत्सवात शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोहरम व गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकित वार्तांकन करणारे पत्रकार, छायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी ओळखता यावा या उद्देशाने प्रेस क्लबने दरवर्षीप्रमाणे पत्रकारांसाठी टी शर्टची व्यवस्था केली आहे. या टी शर्टचे अनावरण जिल्हा पोलीस अधिक्षक शर्मा यांच्या हस्ते करुन, त्यांच्याकडे प्राथमिक उपचाराची औषधी किट सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी पोलिस उपाधिक्षक (शहर) संदिप मिटके, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक पुनम पाटील, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे आदिंसह पत्रकार बांधव उपस्थित होते. लवकरच प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांना टी शर्टचे वाटप करुन, प्राथमिक उपचारासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या औषधी किट बंदोबस्तातील पोलीसांकडे सुपुर्द केल्या जाणार असल्याची माहिती मन्सूर शेख यांनी दिली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget