DNA Live24 2015

आपला गणपती बनवा स्पर्धा उत्साहात

अहमदनगर :
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, महिलांनी आकर्षक इकोफ्रेंडली गणेश मुर्त्या साकारल्या. निमित्त होते प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप, लायनेस व लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती बनवा कार्यशाळा व स्पर्धेचे. या स्पर्धेला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महिला स्वत: बनवलेल्या या शाडू मातीच्या गणपती मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापणा घरोघरी करणार आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी पुढे सरसावलेल्या महिलांनी बाळपणाच्या विश्‍वात रममाण होऊन गणपती बनविण्याचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून लुटला. मातीच्या गोळ्याला आकार देत मुर्तीकार विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी आपल्या लाडक्या बाप्पांची इकोफ्रेंडली गणेश मुर्ती साकारली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानी बागडे, शरयू बागडे, लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा राजश्री मांढरे, प्रयासच्या अध्यक्षा अलका मुंदडा, नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा प्रविणाताई घैसास, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे, निलम परदेशी, छाया राजपूत, राजश्री शितोळे, नसरीन शेख, लतिका पवार, हेमलता बरमेचा, मधू बोरा, विद्या बडवे, शोभना गट्टाणी, पुष्पा कटारिया, अश्‍विनी भंडारे, शर्मिला कदम, सविता जोशी, अजिता एडके, स्वाती गुंदेचा, मधू बोरा, राखी पेटकर, प्रियंका ठुबे, दिपा मालू, शिला गुगळे, डॉ.मंगल सुपेकर, अ‍ॅड.ज्योत्सना कुलकर्णी, मंगल भुजबळ आदि उपस्थित होत्या.

घेण्यात आलेल्या आपला गणपती बनवा स्पर्धेत प्रथम-राखी पेटकर, द्वितीय-दिप्ती मुंदडा, तृतीय- शारदा लड्डा, उत्तेजनार्थ- सोनल लखारा, माधवी मांढरे, अंजली गायकवाड या विजेत्यांना शिवानी बागडे व शरयू बागडे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिलांसाठी विविध बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget