DNA Live24 2015

स्वच्छता हीच सेवा अभियानाला प्रतिसाद

अहमदनगर : 
तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाने पुढाकार घेत गावातील मंदिर, मस्जिद व व्यायामशाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच ग्रामस्थांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करीत स्वच्छतेसाठी आवाहन करण्यात आले. या अभियानात ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.

या अभियानात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, बन्सी जाधव, संजय पुंड, उद्योजक चाँद शेख, जयवंत जाधव, सतीश गायकवाड, अक्षय चौधरी, दिपक गायकवाड, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, नबाब शेख, विशाल गायकवाड, अतुल फलके, अशोक खळदकर, सुरज जाधव, अक्षय कदम, विष्णू शिंदे, अनिकेत गायकवाड, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे, शुभम कदम, बाळू फलके, सतीश गायकवाड आदिंसह वीनर ग्रुपचे युवा सदस्य सहभागी झाले होते.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, गावातील वातावरण प्रसन्न राहून साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेची गरज आहे. घराप्रमाणे सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. रोगराईला आळा घालण्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. स्वच्छता अभियान उपक्रमापुरते मर्यादित न ठेवता चार वर्षापासून संस्थेच्या वतीने गावात विविध सण, उत्सव महापुरुषांच्या जयंती प्रसंगी स्वच्छता अभियान राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget