DNA Live24 2015

गिरणा काठावर फुलला पद्मालय ब्रँड

दुधाचा पद्मालय ब्रँड !
------------------
जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या दापोरी (ता. एरंडोल) सारख्या जेमतेम 700 ते 800 लोकसंख्येच्या गावात पवन पुंडलिक पाटील यांचा पद्मालय डेअरी फार्म आहे. त्यांच्याकडे संयुक्त कुटुंबाची 100 एकरावर शेती आहे. त्यांचे वडील व काका सर्व शेती सांभाळतात. पवन पूर्णपणे दुग्ध व्यवसाय पाहतात.

प्रक्रियेवर विशेष भर...
पवन यांनी 4 होल्सिटीन फ्रीजियन (एचएफ) गायींपासून व्यवसायाची सुरवात केली होती. आज त्यांच्या गोठ्यात जातिवंत २० संकरित गायी, ४५ जाफराबादी म्हशींची संख्या आहे. दोन्ही वेळचे मिळून 200 ते 225 लिटरपर्यंत दूध संकलन होते. ग्राहकांची गरज भागवून शिल्लक राहिलेल्या दुधापासून दही, ताक, तूप तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

पद्मालय डेअरी फार्मची वैशिष्टे....
गायींसाठी मुक्त संचार गोठा पद्धती, दुधाळ जनावरांना खाद्य म्हणून हिरवी वैरण व मुरघास, दुध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर, दुधावर होमोजिनेशन व पाश्‍चरायझेशन प्रक्रिया, पद्मालय ब्रँडने पिशवीबंद दूध पॅकिंग, जळगाव शहरात वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा, अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या व्यवसायात पाहायला मिळतात.
संपर्क ः पवन पाटील
मो. 8329486398
------------------
शब्दांकन- जितेंद्र रघुनाथ पाटील, ममुराबाद
मो. 9011047325

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget