DNA Live24 2015

दहशतीला रोखणारे अफगाणी दुध क्षेत्र


अफगाणी जनतेला एकत्र जोडण्यासाठी पशुपालनाचा व्यवसाय अधारवड ठरतो आहे.  दहशतवादी कारवाईचा सामना करत देशी गाईंच्या संगोपनात अफगाणी जनता त्यांचा दिवस व्यस्त करत आहे. दहशतीच्या वातावरणात उदरनिर्वाहाचा हक्काचा धंदा म्हणून दुध उत्पादन क्षेत्र कात टाकत आहे. अफगाणीस्थानात देशी गाईंचा उपयोग प्रामुख्याने दुधउत्पादनासाठी केला जातो. त्यातील कंदहारी जात भारतात देखिल पहायला मिळते. कंदहारी, कुणारी, वाहटाणी, सिस्तानी या अफगाणी देशी गाईंच्या संगोपनातून दहशतीचे सावट पुसट करणारे अफगाणी पशुपालक हळूवार पणे दुध प्रक्रीया क्षेत्राकडे वळत आहेत.   

पृथ्वीवर निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अनेक देशांपैकी अफगाणिस्तान हा एक महत्वाचा देश आहे. अफगाणी निसर्ग सौंदर्यात हिंदु कुश पर्वताने तर मोलाची भर टाकली आहे. हिंदुस्थानी व अफगाणी जनतेला जोडणारा हा एक महत्वाचा दुवा आहे.  हिंदुकुश पर्वत रांगाच्या परिसरात मुबलक चारा असल्याने या भागात मुबलक पशुधन होते. काही दशकांपूर्वी अफगाणीस्थानात होत असलेल्या स्थित्यांतरामुळे या भागाबरोबरच देशातील पशुधन धोक्यात आले होते. त्याचा परिणाम दुध उत्पादनावर झाला होता. अफगाणी जनता या पारंपारिक व्यवसायापासून हळूवार पणे दुर गेली होती. लोकांना एकत्र जोडण्यासाठी दुधव्यवसाय हा महत्वाचा दुवा असल्याचे स्थानिक राजकीय पुढारी त्यांच्या भाषणातून वारंवार सांगत होते. राजकीय पुढार्यांतच्या शब्दाला मात्र क्रुतीची जोड मिळत नव्हती. दुग्ध व्यवसायातून लोकांना जोडण्याच्या या संकल्पनेला अस्तित्वात आणण्यासाठी लँड ओ लेक्स या संस्थेने सन 2004 साली पुढाकार घेतला. दहा वर्षापासून अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या या संस्थेचे दुध उत्पादनात महत्वपुर्ण योगदान आहे. 

अफगाणी गाईंच्या काही स्थानिक जाती ! 
अफगाणीस्थानात देशी गाईंचा उपयोग प्रामुख्याने दुधउत्पादनासाठी केला जातो. त्यातील कंदहारी जात भारतात देखिल पहायला मिळते. अफगाणी गाईंच्या काही निवडक जाती खालील प्रमाणे 
कंदहारी 
कुणारी 
वाहटाणी 
सिस्तानी 




लँड ओ लेक्स संस्था 
अफगाणिस्तानमध्ये दुध उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने गेल्या दशकापासून ही संस्था कार्यरत आहे. अफगाणी दुध निर्मिती वाढविण्याच्या उद्देशाने अंतरराष्ट्रीय पातळीवरुन या संस्थेला मदत होत असते. गेल्या दशकभराच्या घोडदौडीनंतर या संस्थेसोबत देशातील अनेक गोपालक सलग्न झाले आहेत.  गोपालकांना मार्गदर्शन करण्याचे काम ही संस्था प्रामुख्याने करत आहे. संस्थेच्या वतीने खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
जनावरांसाठी उत्तम चारा निर्मिती झाली पाहीजे या उद्देशाने योग्य बियाणांची निवड कशी करावी हे शेतकर्यांनना समजावून सांगितले जाते. 
खतांचे नियोजन करुन दिले जाते. 
संस्थेचे प्रतिनिधी कृषी विस्ताराचे दुत म्हणून काम करतात. अफगाणीस्थानच्या कृषी विभागासोबत संस्था सलग्न आहे. 
दुध उत्पादन वाढीसाठी प्रक्षेत्र भेट व विविध प्रकारचे सर्वे संस्थेच्या वतीने केले जातात. 


कौशल्य हस्तांतरण कार्यक्रम 
लँड ओ लेक्स संस्थेच्या वतीने सन 2007 पासून पशुधन वाढीच्या उद्देशाने कौशल्य हस्तांतरण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. निवडक गोपालक पशुधन वाचविण्यासाठी विविध कौशल्यांचा वापर करत असतात. वापरण्यात येणार्याच कौशल्यांमध्ये ठराविक गो पालक यशस्वी होतात. यशस्वी झालेल्या गो पालकांचे कौशल्य इतर शेतकर्यां ना प्रेरणादायी ठरत असते. त्यामुळे शेतकरी कौशल्यांचे हस्तांतरण इतर शेतकर्यां ना करुन देण्यासाठी लँड ओ लेक्स या संस्थेने सातत्याने पुढाकार घेतला आहे.

हिंदु कुश पर्वत रांगामधील ईलाही नावाच्या शेतकर्या ने डोंगर रांगामधील हिरव्या गवताच्या लाद्या करुन त्या गाईला दिल्या होत्या. त्यासाठी त्याने अगोदर जमिन भुस भुशीत केली. जमिन हलकी केल्यानंतर तो चारा उपटला व गाईला दिला. चार्यायचा प्रश्न मिटल्यानंतर दुध उत्पादनात वाढ झाली होती. त्याच्या या प्रयत्नाला त्याने तांत्रिकतेची जोड दिली व  प्रकारच्या लाद्या विक्रीचा व्यवसाय त्याने सुरु केला. दुधव्यवसायाला चारा विक्रीची जोड मिळाल्याने त्या ईलाहीच्या उत्पन्नात वाढ झाली असून चारा विक्रीचा व्यवसाय सध्या जोमात सुरु आहे. शेतकर्यांिच्या या ज्ञानाचा लाभ इतर शेतकर्यां ना झाला पाहीजे या उद्देशाने ही संस्था सातत्याने कार्यरत आहे. 

पी.पी.पी अंतर्गत दुध प्रक्रीया उद्योग 
लँड ओ लेक्स च्या दशकभराच्या कालावधीनंतर कुंडूझ शहरात पब्लिक प्रायवेट पार्टनरशीप अंतर्गत दुधावर प्रक्रीया करणारा उद्योग उभारण्यात संस्थेला यश आले आहे. सातत्याने दहशतवादाच्या आड दडणारी जनता हळूवारपणे विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. दुग्ध उत्पादनाच्या संकल्पनेमुळे काबुल, मझार व हेरात या शहरांतील 1500 लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. निर्माण झालेल्या रोजगारांमध्ये 30 टक्के महिलांना विशेष संधी देण्यात आली आहे. सातत्याने बुरख्याच्या आड राहणार्याध महिला रोजगाराच्या निमित्ताने प्रवाहात येत आहेत. ही अफगाणीस्तानच्या विकासाच्या दृष्टीने जमेची बाजु आहे. देशभरातील दुध उत्पादकांना या प्रक्रीया उद्योगाशी सलग्न करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. 

जनावरांच्या अरोग्यासाठी पुढाकार 
अफगाणी गाईंना प्रामुख्याने पायाच्या व तोंडाच्या व्याधीने ग्रासले आहे. गाईंना होणार्या  या व्यांधीवर उपचार करण्याच्या उद्देशाने महंम्मद व जफर या दोन डॉक्टरांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यानी एका महिन्यात 1000 पेक्षा अधिक गाईंना बरे केले आहे. एक लाख कुटूंबातील गाईंना मोफत उपचार देण्याचा त्यांचा मानस आहे. मंहम्मद व जफर यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नीची साथ मिळाली असून त्या दोघीही डॉक्टर आहेत. ही दोनही जोडपी आता लँड ओ लेक्स या संस्थेशी सलग्न झाले आहेत. 

लेखक : विशाल केदारी (कृषी पत्रकार)
मो. ७७१९८६००५८

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget