DNA Live24 2015

सामाजिक विकासात पत्रकारितेची भूमिका महत्वाची : प्रा. चंदनशिवे

अहमदनगर :
सामाजिक विकासात पत्रकारितेची महत्वाची भूमिका असून समाजातील सकारात्मक बाबींना प्रकाशात आणून इतरांसाठी प्रेऱणा निर्माण करण्याचे काम पत्रकारिता करीत असते, असे प्रतिपादन न्यू आर्टस्, कॉमर्स एन्ड सायन्स महाविद्यालयाचे संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख व समीक्षक प्रा. बापू चंदनशिवे यांनी केले.

बी.पी. एच.ई. सोसायटीचे सीएसआरडी-समाजकार्य व संशोधन संस्था आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दिनांक 6 सप्टेंबर रोजी लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ आणि माहिती, शिक्षण व सामाजिक विकासात पत्रकारितेची भूमिका या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे आणि प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, सहायक माहिती अधिकारी गणेश फुंदे, प्रा. लोंढे आदींची उपस्थिती होती.  

यावेळी प्रा. चंदनशिवे म्हणाले, शिक्षणात संवाद महत्वाचा आहे. सामाजिक विकास ही महत्त्वाची गरज आहे, देशाच्या विकासात सामाजिक विकास महत्वाचा ठरतो. पत्रकारितेला चौथा खांब म्हटले गेले आहे. पत्रकार म्हणून काम करताना वाचन महत्वाचे आहे, शिक्षण आणि समाजाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे. बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलत गेली असली तरी त्यावर सामाजिक दायीत्व आहे. पत्रकारिता क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन हा व्यापक हवा. समाजात घडणाऱ्या गोष्टींबाबत स्वतंत्र विचारांची बैठक त्याला हवी. तरच तो, त्याच्यासमोर येणाऱ्या आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरा जाऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री. चव्हाण यांनी यावेळी सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विकास आणि पर्यायाने देशविकास होत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील राळेगणसिद्धी व हिवरेबाजार गावांनी केलेले काम पत्रकारितेच्या माध्यमातून देशभर पोहचले.  पत्रकारिता सामाजिक विकासात महत्वाची भूमिका प्रभावीपणे बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले

लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कऱणारे विद्यार्थी तसेच शेतकरी, नोकरदार, उद्योजक, महिला अशा समाजातील सर्व घटकांपर्यंत हे मासिक जावे, असा उद्देश असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाचे निर्णय, योजनांची माहिती, मंत्रीमंडळाचे निर्णय आदींची वस्तुनिष्ठ माहिती यांत असते. लोकराज्य वाचक अभियानासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी माहितीदूत हा उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

सीएसआरडीचे संचालक डॉ. पठारे म्हणाले, शैक्षणिक उपक्रमाबरोबरच ग्रामीण आरोग्य, ग्रामविकास, टंचाई, शेती आदी विषयाच्या अनुषंगाने या संस्थेच्या माध्यमातून संशोधन व काम सुरू आहे. आजचा हा परिसंवाद याचाच एक भाग आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे. पत्रकारिता क्षेत्रात अनेक संधी आहेत, या क्षेत्राकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले

 यावेळी सीएसआरडी प्रांगणातील लोकराज्य स्टॉल्सलाही समाजकार्य अभ्यासक्रम आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget