DNA Live24 2015

पोलिस पाटील भरती प्रक्रिया कार्यक्रम रद्द


अहमदनगर :
कर्जत उपविभागातील कर्जत व जामखेड या दोन तालुक्‍यातील एकूण 53 गावातील  पोलिस पाटील रिक्‍त पदे भरण्‍यासाठी तहसील कार्यालय कर्जत येथे दिनांक 19 सप्‍टेबर 2018 रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. परंतू राज्‍य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्‍हयातील दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 ते 29 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूका घेण्‍यात येणार असल्‍यामुळे आचार संहिता लागू झालेली आहे व ती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्‍वात राहणार आहे.  त्‍यामुळे पोलिस पाटील भरती आरक्षण सोडतीचे कार्यक्रम रद्द करण्‍यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम समाप्‍त होताच पोलिस पाटील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुनश्‍चः  घेण्‍यात येणार आहे असे उप विभागीय अधिकारी अर्चना नष्‍टे यांनी  एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget