DNA Live24 2015

महाराष्ट्रात अस्मानी आणि सुलतानी संकट..!

टीम कृषीरंग (महाराष्ट्र) :
सह्याद्री घाटमाथ्यावर जोराचा पाऊस झाल्याने धरणे तुडुंब आहेत. तर दुसरीकडे पर्जन्य छायेखाली असलेल्या भागासह मराठवाडा, खानदेश व विदर्भातील बहुसंख्य तालुक्यांत दुष्काळी ढग गडद झाले आहे. अशावेळी अस्मानी संकटात राज्य सरकारच्या अनास्थेमुळे सुलतानी संकट आणखी गहिरे झाले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुणे, सातारा, ठाणे व कोल्हापूर आदी भागात झालेल्या जोरदार मोसमी पावसामुळे काही तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. या भागातील धरणेही भरून वाहत आहेत. अशावेळी अहमदनगर, सोलापूर, नाशिक, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व खानदेश या पट्ट्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पावसाच्या अनियमित व अवेळी पडण्याच्या परिणामामुळे राज्यभर दुष्परिणाम दिसत आहेत.

ग्लोबल वार्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढीचे हे दुष्परिणाम असल्याचे नासा आणि इतर जागतिक संशोधन संस्थांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. त्याकडे लक्ष देण्यास अजूनही शेतकरी, नागरिक व सरकारी यंत्रणांना वेळ मिळालेला नाही. मात्र, यामुळेच आता दुष्काळी संकट गहिरे होऊन यंदा राज्यभर भीषण पाणी टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सव कालावधीत ग्रामीण जनतेच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget