DNA Live24 2015

व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अहमदनगर :
मोहरम व गणेशोत्सवा निमित्त निमगाव वाघा (ता.नगर) येथे धार्मिक एकतेचे दर्शन घडवित व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाने हा सामाजिक उपक्रम राबविला.

संस्थेच्या वतीने स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाची आरती मुस्लिम समाजातील युवकांच्या हस्ते करण्यात आली. तसेच समाजात वाढती व्यसनाधिनता लक्षात घेता व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देणार्‍या पोस्टरांचा देखावा गणेश मंडळाने साकारला आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सैफ शेख, शाहिद सय्यद, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, विशाल फलके, सोमनाथ डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, वैभव पवार, पै.स्वराज डोंगरे, अन्सार शेख आदि उपस्थित होते.

यावर्षी एकत्र आलेल्या मोहरम व गणेशोत्सवा निमित्त जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी संस्थेच्या पुढाकाराने गावात गणेश मंडळ व मोहरम यंग पार्टींनी एकत्रित दोन्ही उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याला प्रतिसाद देत संस्थेने हा उपक्रम घेतला. युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या व्यसनमुक्तीवर गुटखा, दारु, धुम्रपान व जुगार याचे दुष्परिणाम दर्शवणारे हाताने काढलेल्या पोस्टर्सचा समावेश असून, याद्वारे गावात जनजागृती केली जात आहे. 
पै.नाना डोंगरे म्हणाले की, ईश्‍वर प्राप्तीसाठी सत्य, अहिंसा व बंधूभाव हे तत्व पायाभूत आहे. सर्व धर्मात मानवतेची शिकवण देण्यात आली आहे. हे उत्सव एकत्र साजरे करुन बंधूभाव वाढीस लागणार आहे. युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असताना जनजागृतीची गरज आहे. तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज बनली आहे.ऑक्सीजनरुपाने जीवन देण्याचे अमुल्य कार्य वृक्ष करतात. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने वृक्षलागवड करुन संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget