DNA Live24 2015

पंधरा दिवस अगोदरच ऑक्टोबर हिट..!


अहमदनगर :
पावसाने दडी मारल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुसंख्य भागात दुष्काळाची चर्चा सुरू झाली आहे. पावसाअभावी पिके जळत असतानाच तापमानात वाढ झाल्याने आता सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिट अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाले आहेत.

राज्यभरातील कमाल तापमानामध्ये वाढ होऊन बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मोसमी पावसाला पोषक स्थिती नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे. महाराष्ट्रात कोरडे हवामान आहे. २५ ते २६ अंशांच्या आसपास असलेले कमाल तापमान सध्या ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात घामाघूम होण्याची वेळ आली आहे. सोमवारी राज्यामध्ये सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३५.५ अंश सेल्सिअस होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget