DNA Live24 2015

अखेर 'कर्जत-जामखेड'साठी मंजुषा गुंड सक्रिय

कर्जत (अहमदनगर) :
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघ भाजपचा हक्काचा गड मनाला जातो. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत येथून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडले जातात. हेच लक्षात घेऊन आता हा विधानसभा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी सक्रिय झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड याही सक्रिय झाल्या आहेत.

सोशल मीडियावर खड्डेमय रस्त्याचे फोटो टाकून गुंड यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र तात्या फाळके यांचा पराभव झाला होता. त्यांच्याकडे सध्या पक्षाने जिल्हाध्यक्ष हे महत्वाचे पद दिले आहे. तसेच गुंड याही सक्रिय झाल्याने या तालुक्यात आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे. फाळके तात्या यांच्या मदतीवर राष्ट्रवादी हा गड ताब्यात घेणार की पुन्हा भाजपलाच येथून प्रतिनिधित्व मिळणार, यासाठीच्या चर्चा कट्ट्यावर झडत आहेत.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget