DNA Live24 2015

फुर्र मल्ल्याच्या दाव्यामुळे अर्थमंत्री जेटली झाले ट्रोल

दिल्ली :
हजारो कोटी रुपये देणी टाळून युरोपात फुर्र झालेल्या उद्योजक विजय मल्ल्या यांनी धक्कादायक दावा केल्याने अर्थमंत्री अरुण जेटली संकटात सापडले आहेत. परदेशात पळून जाण्यापूर्वी मल्ल्या जेटली यांना भेटून काय कानमंत्र देऊन गेले असतील, याचा विचार करीत सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिस्ट त्यांना जोरदार ट्रोल करीत आहेत.

किंगफिशर कंपनीचे सर्वेसर्वा आणि बँकांना हजारो कोटींचा चुना लावून गेल्याने विजय मल्ल्या चर्चेत असतात. त्यांना खासदारकी देतानाही भाजपने पायघड्या टाकल्याचे किस्से फिरत असतात. त्यातच सरकारी यंत्रणांना फसवून ते परदेशी पळून गेल्याने भाजपाची आधीच गोची झालेली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही यास जबाबदार असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. अशावेळी पुन्हा एकदा मल्ल्या यांनी जेटली यांना भेटून देश सोडल्याचे सांगितल्याने सरकार टीकेचा विषय बनले आहे.

जेटली किंवा कोणाच्या आशीर्वादाने मल्ल्यांनी देश सोडला, असे प्रश्न ट्रोल करून मांडले जात आहेत. याप्रकरणी भाजप सरकार बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. तर विरोधक जोशात आहेत. या विषयावर कार्टुनही जोरात चालत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget