DNA Live24 2015

यशोगाथा : कामगंध सापळ्यांच्या उपयोगाने बोंडअळीवर नियंत्रण

किन्ही पवारचे शेतकरी भगवान तोरमल यांचा यशस्वी प्रयोग

बोंडअळीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने प्रतिकुल परिस्थितीतही कापसाची आदर्श शेती करून दाखवली आहे. उत्तम पीक नियोजन आणि बोंडअळीचा बंदोबस्त करून भगवान तोरमल या तरुण शेतकऱ्याने मागील वर्षी 30 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेतले. यंदाच्या हंगामात विक्रमी उत्पादन करण्याच्या मार्गासोबत शेतकऱ्यांमध्ये असलेली बोंडअळीची भिती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कामगंध सापळ्याचा वापर करून बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार येथील भगवान अशोक तोरमल या तरुण शेतकऱ्याने परंपरागत शेतीमध्ये नवनवे प्रयोग सुरु केले आहेत. भगवान तोरमल यांनी 18 एकर शेतीमध्ये कापूस, सोयाबीन पिकांची लागवड करताना कापसासाठी नवीन पद्धत विकसीत केली. मागील वर्षात कापसाचे विक्रमी उत्पादन करायचे या उद्देशाने दक्षिण-उत्तर लागवड करून कापूस पिकातील अंतर वाढवले. शेणखताचा अधिक वापर करून गरजेनुसार पाणी दिले. कापसाची वाढ जोमाने होत असताना तुडतुडे, शेंदरी आणि गुलाबी बोंडअळीने हल्ला केला. मात्र, खचून न जाता कृषी तज्ञांशी संपर्क साधून डाऊ ॲग्रो सायन्सच्या तज्ञांचा सल्ला घेतला. कापसाची वाढ जोमाने व्हावी म्हणून शेणखत आणि तीन वेळा पाणी दिले. सोबत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किटकनाशकांची फवारणी केल्याने बोंडअळी, मावा, तुडतुड्याचा नायनाट करण्यासाठी मदत मिळाली. नियोजनबद्ध पाणी, खत आणि फवारणी केल्याने 30 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळाले. यंदा कापूस उत्पादनात भरारी घेण्यासाठी नव्या पद्धतीने लागवड केली आहे.

यंदा सुरुवातीपासून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार कामगंध सापळे लावले. पाऊस कमी असल्याने कापसाच्या वाढीसाठी शेणखताची मात्रा, पाणी आणि एकरी 150 मिली किटकनाशकाची फवारणी केली. त्यानंतर एकरी 180 मिली दुसऱ्या किटकनाशकाची फवारणी केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखणे सुरु आहे. पारंपारिक शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तज्ञांच्या सल्ल्याने बोंडअळी आणि नैसर्गिक संकटाला तोंड देत कापसाच्या उत्पादनात वाढ करता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. यंदा मागच्या वर्षीपेक्षा विक्रमी कापूस उत्पादन होईल असा विश्वास भगवान तोरमल यांना आहे.

बोंडअळीवरील उपाययोजना भगवान तोरमल यांच्याच शब्दात

मागील वर्षी दुसऱ्या टप्प्यात बोंडअळीने हल्ला केल्यानंतर प्रभावी उपाययोजना केल्या. यंदा तो धोका लक्षात घेऊन कापसाची लागवड करताना दिशा आणि झाडातील अंतर महत्त्वाचे ठरत आहे. दक्षिण-उत्तर पद्धतीने लागवड करताना दोन ओळीतील अंतर वाढवून झाडाचे अंतर कमी केल्यास वाढ चांगली होते. शिवाय बोंडअळी, तुडतुडे यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी मदत होते. सध्या कामगंध सापळे हे परिणामकारक ठरत असल्याने त्याचा शेतकऱ्यांनी वापर करणे गरजेचे आहे. 

निलेश तायडे,
माहिती सहायक, बुलडाणा
@'महान्यूज'

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget