DNA Live24 2015

लांडग्याने केल्या सात शेळ्या फस्त..!


भडगाव (जळगाव) :
कनाशी-देव्हारी परिसरात लांडग्याचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या लांडग्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. त्याने गोठ्यातील १० पैकी सात शेळ्या फस्त केल्या. यात शेळ्या मालकांचे मोठे नुकसान झाले. परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कनाशी-देव्हारी येथील रहिवाशी दादाभाऊ शंकर भिल्ल यांनी त्याच्या घरामागे शेतालगत गोठ्यात १० शेळ्या बांधल्या होत्या. लांडग्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. यात लांडग्याने सात शेळ्या ठार केल्या. एक शेळी जखमी झाली आहे. दादाभाऊ भिल्ल गोठ्याकडे रात्री चक्कर मारण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. तर समोरच शेतात लांडग्याचे डोळे चमकत असल्याचे त्यांना दिसले. याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांना मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाने वनपाल आर. व्ही. चौरे, पळासखेडा येथील वनरक्षक आर. ए. पिंजारी, नाकेदार वाय. जी. दीक्षित यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी सागर कसबे, निंभोरा तलाठी पी. एस. पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात घटनेच्या परिसरात लांडग्याचे ठसे उमटलेले आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले अाहेत. शेतकरी, महिला, मजूर शेतात जाण्यासाठी धजावत नाही. भीती पसरली अाहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget